जत,संकेत टाइम्स : जत येथील सामाजिक कार्यकर्ते,महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांना भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार पंतगे दांपत्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
जत सारख्या दुर्लक्षित तालुक्यात दिनकर पतंगे यांनी कृषी अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यापासून लोकसेवेचे वृत्त स्विकारले आहे.कोरोना काळात लोक घराबाहेर पडण्यास घाबरत असताना पंतगे यांनी शेकडो नागरिकांना मदत केली आहे.
कोरोना बचावाची उपकरणे,धान्ये,आर्थिक मदत,कर्मचाऱ्यांना जेवन,विविध साहित्याचे त्यांनी वाटप केले,भावनिक मदत करत नागरिकांत आत्मविश्वास निर्माण केला होता. सामाजिक आपत्ती, जळीग्रस्त कुंटुबिय,गंरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा यज्ञ त्यांचा सतत चालू आहे.त्याची दखल घेत हा पुरस्कार पंतगे यांना देण्यात आला आहे.
जळगाव डीसीसी बँकेचे चेअरमन विजय पवार तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजेते श्री उस्मान पटेल,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजेत्या सौ पाकीजा पटेल, आदिलशहा फारुकी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ४३ जणांना हा पुरस्कार देण्यात आला.
सामाजिक दायित्वाची जाण व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मान्यवरांना आम्ही हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहोत,असे यावेळी संयोजक सौ.पाकिजा पटेल यांनी सांगितले. दिनकर पतंगे यांचे सामाजिक काम वाखण्याजोगे आहे,असेही सौ.पटेल म्हणाल्या.दरम्यान दिनकर पतंगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.