फॅबटेक  पॉलीटेक्निक  मधील ६ विद्यार्थिनींची जीकेएन फोकर्स एल्मो इंडिया या नामांकित कंपनी मध्ये निवड

0

 

सांगोला: येथील फॅबटेक पॉलीटेक्नीकच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील  वैष्णवी कुंभार, भक्ती वाडकर, कविता खांडेकर,  श्रेया कारंडे, धनश्री सावंत व वैष्णवी बिराजदार या सहा विद्यार्थिनींची जीकेएन फोकर्स एल्मो इंडिया या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी दिली.

जिकेएन फोकर्स एल्मो इंडिया कंपनीच्या अधिकारी  केतकी पाटेकर यांनी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातील मुलींसाठी  कॅम्पसचे आयोजन केले होते. या मध्ये टेक्निकल टेस्ट, तांत्रिक कौशल्य व मुलाखत या निवड प्रक्रिये द्वारे ६  विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. जीकेएन हि एरोस्पेस सेक्टर मधील अग्रगण्य कंपनी असून भारताबाहेर जर्मनी, मेक्सिको व नेदरलँड यासारख्या देशामध्ये कंपनीचा विस्तार असल्याचे सेंट्रल  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी सांगितले.

जीकेएन या मल्टीनॅशनल एरोस्पेस  कंपनीमध्ये निवड झाल्याने संस्थेचे चेअरमन  श्री. भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर,  श्री अमित रुपनर,  कार्यकारी संचालक  श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे,  प्राचार्य प्रा.शरद पवार, इलेक्ट्रॉनिक्स  अँड टेलीकम्युनिकेशन  विभागाचे  विभाग प्रमुख प्रा.महेश वाळूजकर यांनी अभिनंदन केले.

Rate Card

हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी पार पाडण्यासाठी  सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ.साहेबगौडा संगनगौडर व डिप्लोमाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर प्रा.तन्मय ठोंबरे व प्रा.भानुदास गडदे यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.