केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे आमदार सावंत यांनी केली 2 कोटी 10 लाखांच्या निधीची मागणी 

0
Post Views : 27 views
जत, संकेत टाइम्स : आमदार विक्रमसिंह सावंत यांनी
तालुक्यातील विविध विकास कामासाठी 2 कोटी 10 लाखांच्या निधीची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. जत येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले आले असता त्यांची भेट घेत आमदार सावंत यांनी निधीची मागणी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की,तालुका विस्ताराने मोठा व कायम स्वरूपी दुष्काळी आहे.महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय कडून येणारा निधी येतो.पण जत तालुका सर्वात  विस्ताराने व मोठा असल्याने आलेला निधी हा कमी पडत आहे. तरी आपल्या विभागाकडून तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करावा.आमदार सावंत यांनी पुढील गावासाठी निधी देण्याची मागणी आहे. बिळूर येथे बौद्ध विहार बांधणे 25 लाख रुपये,येळदरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी
20 लाख,वळसंग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 20 लाख रुपये,उमराणी येथे बौध्द विहार 25 लाख रुपये, माडग्याळ येथे बौध्द विहार 25 लाख रुपये, बेळोंडगी येथे बौध्द विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण 40 लाख रुपये,संख येथे बौध्द विहार 25 लाख रुपये, जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाचनालय, सामाजिक सभागृह व  सुशोभिकरणासाठी 40 लाख रुपये निधीची मागणी केली.

 

यावेळी माजी महापौर विवेक कांबळे ,संजय कांबळे, बाबासाहेब कोडग, अॅड युवराज निकम,रावसाहेब मंगसुळी,बाळासाहेब तंगडी,सइसाब नदाफ,आप्पू माळी  आदी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.