कमल ऑर्थोपेडीक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,जत येते डेंटल एक्स-रे विभाग सुरु
जत, संकेत टाइम्स: डॉ. कैलास सनमडीकर सर यांचे कमल ऑर्थोपेडीक सेंटर चे आता कमल ऑर्थोपेडीक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रूपांतर झाले आहे.यामध्ये ऑर्थोपेडीक,मेडिसिन,सी. टी. स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर हे विभाग सुरु आहेत.यामुळे जत तालुक्यातील गरजू व गरीब लोकांना या वैद्यकीय सुविधाचा खूप मोठा फायदा होत आहे.आज या मल्टिहॉस्पिटल सेंटर मध्ये आता दातांचे पूर्ण एक्स-रे विभाग सुरु केला आहे.आता दातांचा एक्स – रे काढण्यासाठी सांगली किंवा मिरजला जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी OPG ची अत्याधुनिक मशीन बसवण्यात आली आहे.या विभागाचे उदघाटन कु.अपर्वा सनमडीकर,डॉ.कैलास सनमडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. सनमडीकर म्हणाले या अत्याधुनिक मशीन मुळे जत तालुक्यातील दंत रोग तज्ञाना फायदा होणार आहे. रुग्णांना दाताचा पूर्ण एक्सरे काडून मिळणार आहे.त्यामुळे अचूक निदान,उपचार करता येणार आहे. यावेळी डॉ. के. प्रसाद, डॉक्टर जानकर सर संस्थेचे संचालक श्री.मेंडेगार सर,जाधव सर,मकानदार सर,संतोष कांबळे,नामदेव कांबळे,नाटेकर सर,कुंभार सर,बाबर सर,पिंटू कदम,भोसले मामा उपस्थित होते
