कोंतेवबोबलाद सोसायटी बिनविरोध | माजी आमदार विलासराव जगताप यांचे प्रयत्न यशस्वी

0
संख, संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोंतेवबोबलाद सर्व सेवा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.गुरुवार  दि.26 मे रोजी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.त्यामुळे 13 अर्जच शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी व गावात शांतता नांदावी यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नामुळे कोंतेवबोबलाद विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध झाल्याचे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख नागनाथ मोटे यांनी सांगितले.
कोंतेवबोबलाद विकास सोसायटीच्या निवडणुकीसाठी नागनाथ मोटे,सौ.दीपा नागनाथ मोटे यांचे दोन अर्ज ,अनिल रगटे,शांताप्पा शिरसाट या पाच उमेदवारांनी गुरुवार  दि.26 मे रोजी अर्ज मागे घेतले.कोंतेवबोबलाद विकास सोसायटीअंतर्गत  कों. बोबलाद,कोनबगी,गुलगुंजनाळ ,करेवाडी, मोटेवाडी अशा पाच गावचे विकास सोसायटीचे कार्यक्षेत्र आहे. पुढीलप्रमाणे बिनविरोध विजयी उमेदवार असे :सर्वसाधारण गटातून शंकर सावंत, रमेश जगताप, लक्ष्मण सबकाळे, दादू भिसे, रजाकसाब पाटील (पाटील), शिवानंद गडदे तुकाराम जगताप,हरिबा जाधव , तर महिला गटातून कोंतेव्वा बिरादार, तंगव्वा कोळेकर ,इतर मागास प्रवर्गातून लक्ष्मण माळी तसेच अनुसूचित जाती/जमाती गटातून  भाऊसो मांग(वाघमारे), तर विशेष मागास प्रवर्गातून जालिंदर व्हनमाणे असे 13 उमेदवारांचे अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.