जत तालुक्यात हरिणांचा कळप 

0
सोन्याळ,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील उटगी आणि मंगळवेढा हद्दीतील लवंगी येथील वनविभागात व आसपासच्या परिसरात वर्षभरापासून कळपातून चुकून आलेले पाच हरिणाचा कळप फिरत आहे. त्याला पाळीव, भटके कुत्र्यापासून त्रास होत आहे. त्यांच्या जीवाला शिकारीचा धोका आहे. या हरणांना वन विभागाने दक्षता घेऊन रेस्क्यू ऑपरेशन करुन सागरेश्वर अभयारण्यात सोडावे, अशी मागणी वनप्रेमी ग्रामस्थांतून होत आहे.
पूर्व भागातील उटगी, निगडी बुद्रुक,उमदीहद्द, मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखाना परिसर सलगर बुद्रुक परिसरात वनविभागात पाच हरणे गेल्या वर्षभरापासून फिरत आहेत. कळपातून हरिण चुकून आले असावे असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. कर्नाटकातील मठात हरिणे पाळले जाते. तेथून पळून आले असावे. हरिणांचा फिरत असलेला कळप सोलापूर येथील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, कर्नाटकातील गुलबर्गा परिसरात काळ्या रानात दरवर्षी जातात.

 

त्या परिसरातील हरिण कळपातील माजावर आलेल्या शेळ्या-मेंढ्या बरोबर आले असावे, असाही अंदाज बांधला जात आहे.उटगी, लवंगी, कारंडेवाडी सलगर बुद्रुक गावच्या सीमेवर रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना हरणांचा कळप दिसतो. तालुक्यात हरणांचा कळप प्रथमच आल्याने नागरिकात उत्सुकता आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.