बेंळूखी सोसायटीत सिध्दनाथ शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पँनेलचा दणदणीत विजय | ९ जागा जिंकत परिवर्तन

0

डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी सर्व सेवा सोसायटीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत शंशिकात जाधव शेठ यांच्या नेतृत्वाखालील श्री.सिध्दनाथ शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पँनेलने दणदणीत विजय मिळवत १३ पैंकी ९ जागावर विजय मिळविला.विरोधी पँनेलला चार जागावर समाधान मानावे लागले.

जत पश्चिम भागातील सक्षम असलेल्या बेंळूखी सर्व सेवा सोसायटीची निवडणूक चुरसीची झाली. सोसायटीवर अनेक वर्ष सुधाकर माळी गटाची सत्ता होती.यंदा त्यांच्या गटातील काही नेते विरोधी गटात गेल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
शंशिकात जाधव शेठ यांनी यावेळी विरोधी गटातील काही नेते व त्यांच्या गटातील उमेदवारांचे तगडे पँनेल उभे केले होते.त्याचबरोबर प्रचार यंत्रणाही जोरात लावत मोठा विजय मिळत अनेक वर्षानंतर सोसायटीची सत्ता मिळवली आहे.
Rate Card
शंशिकात जाधव शेठ गटातील विजयी उमेदवार,सर्वसाधारण महादेव ज्ञानू माळी, चंद्रकांत आबासाहेब चव्हाण,बाळासो ज्ञानू चव्हाण, वसंत कृष्णा म्हमाने, आनंदराव शामराव चव्हाण,सुरेश सोमलिंग अथणी, महिला राखीव ; फुलाबाई सदाशिव कदम,अनुसूचित जाती जमाती ; धोंडिराम नाना चंदनशिवे,विशेष मागास प्रवर्ग ; वसंत गोविंद शिंगाडे
विरोधी गटाचे विजयी उमेदवार ; अशोक सावळा माळी,विजय शिवाजी चव्हाण, महादेव लक्ष्मण अथणीकर,संगिता सुरेश अथणी
पारदर्शी कारभार करू 
अनेक वर्षानंतर गावची अर्थवाहिनी असलेल्या सोसायटीवर आम्ही सत्ता मिळविली आहे.सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावू,आमचे पदाधिकारीही सभासद हिताचा कारभार करतील.शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टा सक्षम करणार आहोत.सोसायटीची प्रशस्त इमारत बांधण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू.
शशिंकात जाधव शेठ
पँनेल प्रमुख

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.