डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी सर्व सेवा सोसायटीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत शंशिकात जाधव शेठ यांच्या नेतृत्वाखालील श्री.सिध्दनाथ शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पँनेलने दणदणीत विजय मिळवत १३ पैंकी ९ जागावर विजय मिळवित स्पष्ट बहुमत मिळवत,वीस वर्षानंतर सोसायटीत संत्तातर करण्याची किमया साधली आहे.
विरोधी पँनेलला चार जागावर समाधान मानावे लागले.
जत पश्चिम भागातील सक्षम असलेल्या बेंळूखी सर्व सेवा सोसायटीची निवडणूक चुरसीची झाली. सोसायटीवर गेली अनेक वर्ष सुधाकर माळी गटाची सत्ता होती.यंदा माळी व माजी सरपंच संजय पाटील यांनी एकत्रितपणे पंनेल उभे केले होते.निवडणूकी पुर्वी माळी गटातील काही नेते विरोधी गटात गेल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
शंशिकात जाधव शेठ यांनी यावेळी विरोधी गटातील काही नेते व त्यांच्या गटातील उमेदवारांचे तगडे पँनेल उभे केले होते.त्याचबरोबर प्रचार यंत्रणाही जोरात लावत मोठा विजय मिळत अनेक वर्षानंतर सोसायटीची सत्ता मिळवली आहे.आम्हाला १३/० विजय अपेक्षित होता मात्र,आमच्या पँनेलचे चार उमेदवार थोड्या मताने पराभूत झाले आहे.पुढील निवडणूकाही अशाच पध्दतीने लढून विजय मिळवू,असे पँनेल प्रमुख शंशिकात जाधव यांनी सांगितले.

विरोधी गटाचे विजयी उमेदवार ; अशोक सावळा माळी,विजय शिवाजी चव्हाण, महादेव लक्ष्मण अथणीकर,संगिता सुरेश अथणी
पारदर्शी कारभार करूअनेक वर्षानंतर गावची अर्थवाहिनी असलेल्या सोसायटीवर आम्ही सत्ता मिळविली आहे.सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावू,आमचे पदाधिकारीही सभासद हिताचा कारभार करतील.शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टा सक्षम करणार आहोत.सोसायटीची प्रशस्त इमारत बांधण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू.शशिंकात जाधव शेठपँनेल प्रमुख