जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : प्रभागरचना 2 जून रोजी प्रसिध्द होणार | हरकती व सूचना 8 जून पर्यंत स्विकारण्यात येणार

0
Post Views : 290 views

सांगली : राज्य निवडणूक आयोगाकडील  दि. 10 मे 2022 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभागरचनेस विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी मान्यता दिली आहे.  जिल्हा परिषद सांगली व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट 3 व परिशिष्ट 3 (अ) जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली, सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा परिषद सांगली यांच्या संकेतस्थळावर दि. 2 जून 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

Rate Card
राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या 10 पंचायत समित्यांचा निवडणूक विभाग व निर्वाचक गण यांच्या हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे कार्यालयीन वेळेत दि. 2 ते 8 जून 2022 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.