डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या फंडातून मतदार संघातील कुडणूर,खलाटी,जिरग्याळ व शिंगणापूर येथे ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वॉटर एटीएम बसविण़्यात येत आहेत.कुडणूर येथील पहिल्या वॉटर एटीएमचे उद्घाटन दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण, उद्योजक बाळासाहेब चव्हाण,संरपच सौ.माने मँडम,उपसंरपच गुलाब पांढरे,माजी संरपच सतिश पांढरे,माजी संरपच अमृत पांढरे,ग्रा.प.सदस्य विलास सरगर,बाबासो सरगर गुरूजी,गोविंद शिंदे,दिपक कोळी,सुभाष कदम व
स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समितीचे सदस्य झाल्यापासून दिग्विजय चव्हाण यांनी मतदार संघातील नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न केले आहेत.सातत्याने ते स्थानिक विविध प्रश्नासाठी काम करत असतात.नव्या धोरणानुसार पंचायत समिती सदस्यांना मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगातील १० टक्के रक्कमेतून चार गावांना वॉटर एटीएम तर डफळापूर येथे रमेश कोरे घर ते दत्ता भोसले घर,शंकर पोतदार घर ते तानाजी भोसले घर,डफळापूर मिरवाड रस्ता ते सवदे- शिंदेवस्ती जि. प. शाळा असे तीन तर शेळकेवाडी येथील अनंतपुर रस्ता ते निर्गुण कोरे घर रस्ता दुरुस्ती येथे एक असे रस्ते पुर्ण झाले आहेत तर मिरवाड वनक्षेत्र ते लवटे वस्ती रस्ता दुरूस्ती काम होणार आहे.मतदार संघातील वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते मुरमीकरण करण्यात आल्याने पावसाळ्यात या भागातील शेतकरी,नागरिकांना यांचा फायदा होणार आहे.
उद्घाटन प्रंसगी दिग्विजय चव्हाण म्हणाले,पंचायत समितीच्या माध्यमातून मतदार संघातील गावातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो.रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आम्ही हे वॉटर एटीएम ग्रामपंचायतीना दिले आहे.या माध्यमातून ग्रामस्थांना फिल्टर पाणी मिळणार आहेचं त्याबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.कुडणूर,शिंगणापूर येथे असणाऱ्या पाणी टंचाईवरही मार्ग काढून नागरिकांना कायमस्वरूपी मुबलक पाणी मिळावे,यासाठी माझा यापुढे प्रयत्न राहिल.