जतमध्ये गौतम ऐवळे यांची स्विकृत नगरसेवकपदी वर्णी

0
1
जत,संकेत टाइम्स : जत नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे गौतम ऐवळे यांची निवड करण्यात आली.
तीन महिन्यांपूर्वी मिथुन भिसे यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.माजी आमदार विलासराव जगताप यांनी गौतम ऐवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

 

पण भाजपचे नगरसेवक विजय ताड, नगरसेवक
शिंदे यांनी वेगळा गट स्थापनेसाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणी केली होती. जिल्हाधिकार्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावत 3१ मे रोजी स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार स्वीकृत
नगरसेवक पदासाठी सोमवारी विशेष सभा झाली.

 

नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर यांनी गौतम ऐवाळे यांचे नाव स्वीकृत नगरसेवक म्हणून जाहीर केले. यावेळी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, मुख्याधिकारी महेश वाघमोडे,गटनेते स्वप्नील शिंदे, गटनेत्या श्रीदेवी सगरे, नगरसेविका दीप्तीताई सावंत उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here