कासेगाव : पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्गावर येवलेवाडीनजीक रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरवर भरधाव मोटर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत जयसिंगपुर (जि. कोल्हापुर) येथील आहेत. ही घटना आज, शनिवारी दुपारी घडली.
अरिंजय आण्णासाहेब शिरोटे (वय ३५), स्मिता अभिनंदन शिरोटे (३८), पृष अभिनंदन शिरोटे (१४), सुनिषा अभिनंदन शिरोटे (४९), विरेंन अभिनंदन शिरोटे (४) अशी मृतांची नांवे आहेत.
कासेगाव (ता. वाळवा) येथील येवलेवाडी फाट्याजवळ पुणे-बंगलोर महामार्गावर रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरवर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या माेटारीने (क्र. एमएच १४ डीएन ६३३९) जोरदार धडक दिली. अपघातात माेटारीतील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांपैकी अरिंजय शिराेटे हे नाैदलाच्या सेवेत हाेते. शनिवारी दुपारी हे कुटुंब माेटारीतुन पिंपरी-चिंचवडहुन जयसिंगपुर येथे येण्यासाठी निघाले हाेते.