करजगी सोसायटीत ४० वर्षानंतर संत्तातर | श्री.जिन्नेसाहेब परिवर्तन पॅनेलचा झेंडा ; १३ पैंकी १३ उमेदवार विजयी 

0
करजगी, संकेत टाइम्स : करजगी (ता.जत) येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली.
अत्यंत चुरसीने व प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत श्री जिन्नेसाहेब परिवर्तन पॅनेलचे सर्व १३ उमेदवार विजय झाले आहेत.गेल्या ४० वर्षानंतर संतातर झाले असून सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकार शाहीला वैतागलेल्या सभासदांनी यावेळी परिवर्तन करत श्री जिन्नेसाहेब परिवर्तन पॅनेलचे सर्वच्या सर्व १३ उमेदवारांन  विजयी केले आहे.सर्वसाधारण कर्जदार गटामधून निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे कंसात पडलेली मते भिमाशंकर मेडीदार , (३७६),लक्ष्मण बगली (३६३),रफिकअहमद बिराजदार (३५८),आप्पासाहेब शिंदे (३५६), मौलासाब सनदी (३५६), मल्लिकार्जुन बलगांव (३५५), लक्ष्मण अक्कलकोट (३५४), मल्लाप्पा बमनळ्ळी (३५४), इतर मागासवर्गीय गट  राचया मठपती (३८३), अनुसूचित जाती मधून जकप्पा चांभार (३८६), भटक्या विमुक्त जाती मधुन रामु कोळी (३८५), महिला राखीव गटामधून सुमित्रा डुमणे (३८९), पार्वती चांभार,करजगी (३८८),
विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

 

यावेळी बोलताना कट्टीमनी सर म्हणाले, हा विजय सर्व सभासद मतदारांचा आहे. सर्व सभासदांनी आम्हाला साथ दिल्यामुळे आम्ही भरघोस मतांनी निवडून आलेलो आहोत.यापुढे सोसायटीत पारदर्शी कारभार होईल,शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावून त्यांची स्तर उंचविण्यासाठी आमचे सर्व संचालक प्रयत्नशील राहतील.

 

पॅनेलचे मार्गदर्शक व प्रमुख अडवोकेट अडव्याप्पा घेरडे म्हणाले,गेली चाळीस वर्ष राजकारण करणारे मोठ्या पुढाऱ्यांनी कर्ज घेऊन वेळेत परतफेड न केल्यामुळे अ वर्ग मधील सोसायटी ड वर्ग मध्ये गेलेली आहे.तरी आपण सर्व नूतन संचालक व आम्ही सगळे मिळून ड वर्ग मध्ये गेलेले सोसायटी सर्व सभासदांच्या विश्वासात घेऊन अ वर्ग मध्ये आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू आणि एक आदर्श सोसायटी बनवूया. वेळी पॅनेल प्रमुख गिरमल्लया मठपती,  भीमाशंकर हनमशेट्टी , सुभाष बालगांव,शिवानंद अक्कलकोट,जयवंत कलबुर्गी,विठ्ठल हंजगी,सायबण्णा ककमरी, मम्मु पटेल,महादेवेप्पा  मेडीदार,बाबुगौडा पटेल, रावत तेली,सायबण्णा बालगांव,सिदगोंडा बगली, याकुब बिराजदार, रुकुमु बिराजदार,भिमु मेडीदार,विठ्ठल बालगांव,  सुरेश बगली, मल्लिकार्जुन अक्कलकोट,हणमंतराय नंदूर,राघवेंद्र होनमोरे, अंबण्णा कळ्ळी, ज्ञानेश्वर बमनळे, खाजेसाब जातगार, राजकुमार बालगांव,महादेव हळके, संतोष जेऊर,सोमनिंग बमनळ्ळी, कल्लण्णा बालगांव, अशोक हळके, उत्तम कट्टीमनी, श्रीमंत बालगांव, अडवेप्पा कोळी, मल्लू जंगमशेट्टी, भिमाशंकर हणमशेट्टी, लक्ष्मण अवटी , बसप्पा अक्कलकोट, नागराज कांबळे, महादेव नाराज, नबिसाब पुळूजकर,सायबण्णा कट्टीमनी, संतोष चांभार,काशिम बिस्ती व करजगी, माणिकनाळ ,मोरबगी, बोर्गी, आधी गावातील सोसायटी सभासद मतदार खास करून उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.