मनाविरूध लग्न,प्रेमी युगलांची आत्महत्या
या घटनेबाबत पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : अश्विनी माळी ही मूळची सरगरे येथील असून सध्या ती एकुंडी येथे राहण्यास आहे. एकुंडी येथील लक्ष्मण शिंदे याच्याबरोबर तिचे प्रेम संबंध होते. तिचा एक जूनला विवाह झाला हाेता. ती मिरज येथून एकुंडी येथे दोन दिवसांपूर्वी आली होती.
सोमवारी दुपारी अश्विनी व लक्ष्मण या दाेघांनी एकत्र विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज पाेलीसांनी वर्तविला आहे. दाेघांनाही अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला