जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील अंकले येथील विकास सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम भागातील अंकले सोसायटीला विशेष महत्त्व आले होते.निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना,स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणीत श्री सिद्धनाथ ग्रामविकास पॅनेलने तेरा पैकी बारा जागा जिंकून विकास सोसायटीवर एक हाती सत्ता स्थापन केली.
या निवडणुकीत भाजप,राष्ट्रीय समाज पक्ष प्रणीत सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनेलला एक जागेवर समाधान मानावे लागले. या विकास सोसायटीमध्ये भाजप प्रणीत पॅनलची एक जागा बिनविरोध झाली होती.तर उर्वरित 12 जागेसाठी ही निवडणूक झाली.या सोसायटीत एकूण 518 मतदार असून त्यापैकी 489 मतदार सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेस,शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणीत श्री सिद्धनाथ शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक सरगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल पाटील,यांनी केले. तर भाजप,राष्ट्रीय समाज पक्ष प्रणीत सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक दुधाळ, युवक नेते शंकर वगरे, रासपचे नेते लक्ष्मण पुजारी यांनी केले. काँग्रेसप्रणीत श्री सिद्धनाथ शेतकरी ग्राम विकास पॅनलविरुद्ध भाजपप्रणीत विकास पॅनेल यामध्ये ही निवडणूक झाली. तर दोन्ही गटाकडून या निवडणुकीत ईर्षेने मतदान झाले होते.या निवडणुकीत काँग्रेसला 12 जागा मिळाल्या तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सर्वसाधारण गट- दुधाळ संभाजी गणपती,(264)दुधाळ रावसो मारुती,(258)दुधाळ मोहन रामा(255)
दुधाळ रावसो तुकाराम,(254)गोरे गुंडा तुकाराम (246)
सरगर अजित कुंडलिक, (245)दुधाळ दिलीप हरी,(246) खराडे विठ्ठल पाडूरंग (241)या निवडणूकीत संजय बाजीराव दुधाळ यांनी विजयी उमेदवार पैकी सर्वाधिक 271मते मिळवून विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती गटातून:ऐवाळे सिताराम बापू 264, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून -दुधाळ संजय बाजीराव 271,महिला राखीव गटातून जानकर बयाबाई शंकर-261, दुधाळ जयश्री नामदेव-261 उमेदवार निवडून आले आहेत.
निवडणूक निकाल लागताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची आतिषबाजी केली.गावातून जंगी मिरवणूक काढली.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील व नूतन संचालक उद्योगपती संभाजी दुधाळ म्हणाले की, आम्ही आत्तापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीच्या माध्यमातून दिली आहे. सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासास पात्र राहून आम्ही चांगल्याप्रकारे काम करून सभासदांचा विश्वासास सार्थ ठरवू. सोसायटीमध्ये कोणत्या प्रकारचे राजकारण केले जाणार नाही. सभासदांचे हित हा आमचा मुख्य उद्देश असेल.
सर्व सभासदांना विविध प्रकारे कर्ज वितरण करून, शेती सुधारून त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. विकास सोसायटी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वाची संस्था असून शेतकरी सभासदांची अर्थवाहिनी आहे. यावेळी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.