बंडाचा असाही फटका,26 ठिकाणी शिवसेना विरूध शिवसेना 

0
157

एकनाथ शिंदे आणि शिवसेना अजित पवारांच्या बंडानंतरची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा निवडणूक चांगलीच रंगणार आहे. अनेक मतदारसंघात सेना विरुद्ध सेना तर दुसरीकडे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, असा थेट सामना होतो आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच चित्र दिसणार, हे निश्चित आहे.

जिथे राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरूद्ध शिवसेना अशा थेट लढती होणार आहेत, अशा जागा आहेत तरी कोणत्या, हे आता पाहुयात. नमस्कार मी गौरी, मुंबईआऊट मध्ये स्वागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये केलेलं बंड असो किंवा अजित पवारांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. या दोन्ही गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या चांगल्याच स्मरणात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेना आमनेसामने होत्या; पण तसंच चित्र हे आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीतही दिसणार आहे.

लोकसभेला शिंदेंची सेना सरस लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर मात केली होती. तर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात मात्र चांगलीच चुरस पाहायला मिळाली. इथे मात्र, शिंदे गट ठाकरेंवर सरस ठरला होता. विधानसभा निवडणुकीतही आता हेच पक्ष एकमेकांसमोर ठभा ठाकले आहेत. विधानसभेच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारी पाहाता २६ मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचं समीकरण पाहिलं तर पहिला मतदारसंघ येतो तो. कोपरी पाचपाखाडी. इथे ठाकरे गटाचे केदार दिघे एकनाथ शिंदेंना आव्हान देणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून एकनाथ शिंदेंचा गड असल्याने त्यांनी आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरुच केलेत. त्यानंतर येतो तो कुर्ला मतदारसंघ.

येथे ठाकरेंच्या सेनेकडून प्रविणा मोरजकर तर शिंदेंच्या सेनेकडून मंगेश कुडाळकर अशी थेट लढत होणार आहे. माहिम मतदारसंघात तर तिरंगी लढत होणार आहे. पण ठाकरेंकडून महेश सावंत आणि सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी सदा सरवणकर अशी लढाई होणार आहे. महाड मतदारसंघात देखील तशीच काही स्थिती आहे. स्नेहल जगताप यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय भरत गोगावले असा सामना आहे

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here