सिंदूर सोसायटीवर भाजपाचा झेंडा

0

जत, संकेत टाइम्स : जत तालुक्यातील सिंदूर येथील सिंदूर सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीने व प्रतिष्ठेची झाली. या निवडणुकीत कॉंग्रेस व भाजपा यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत भाजपने 13 पैकी 13 जागा  जिंकून निर्विवाद सत्ता हस्तगत केले. या निवडणुकीत  चेअरमन शिवानंद हारूगेरी व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्रीशैल मागदुम यांची 25 वर्षे सत्ता होती. तरी यावेळी त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.

 

या निवडणुकीत विवेकानंद बाळीकाई, सरपंच गंगाप्पा हारूगेरी, राजू हिप्परगी, रमेश काडगोंड, चंद्रकांत पाटील, मल्लिकार्जुन बाबाबनगर, बासु मुल्ला यांनी नियोजन बध्द प्रचार करून पॅनलचे सर्वच उमेदवारांना निवडून आणले.

 

Rate Card

निवडणून आलेले संचालक मलकाप्पा  गुराप्पा काडगोंड, आण्णाप्पा परगोंडा जनगोंड, शिवानंद कलाप्पा बाबाबनगर, सदाशिव चन्नप्पा माडग्याळ, मुदशी सुरेश नंदयेप्पा मुडशी, हणमंत भीमाण्णा हिप्परगी, महेश उदयकुमार मुडशी, महेश महादेव मेंडिगिरी, अक्काताई रमेश पाटील, देवकीबाई अप्पासाहेब मदभावी, भिमगोंडा काळाप्पा सुतार, श्रीशैल मल्लाप्पा कोळी, यल्लाप्पा यशवंत कांबळे.निकालानंतर भाजपा समर्थकांनी जल्लोष केला.  या निवडणूक निर्णय मल्लेश कोळी यांनी पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.