फॅबटेक पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरु
सांगोला : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी फॅबटेक पॉलीटेक्नीक सांगोला या महाविद्यालयात शासनमान्य सुविधाकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रा मार्फत डिप्लोमा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया १० जून पासून सुरु झाली असल्याची माहिती पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी दिली.
