बालगाव येथे तरूणाची आत्महत्या

0
Post Views : 510 views

बालगाव,संकेत टाइम्स : बालगाव ता.जत येथील २७ वर्षीय तरूणाने गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायकांळी घडली आहे. यल्लाप्पा कल्लाप्पा पुजारी वय २७,रा.बालगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.याबाबत उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Rate Card
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यल्लाप्पा पुजारी याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत गुरूवारी सायकांळी ५ वाजण्याच्या दरम्यान गळपास लावून आत्महत्या केली.घरातील अन्य लोक आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

 

याबाबत पोलीसांना कळविण्यात आले.सा.पो.नि.पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार काळे व मोरे यांनी पंचनामा करून मृत्तदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.