स्वाभिमानी शिक्षक मंडळाकडून लोकप्रिय सभासदांना उमेदवार म्हणून संधी

0
3

 

जत,संकेत टाइम्स : शिक्षक बँकेच्या येणाऱ्या 3 जुलै रोजी होणाऱ्या मतदानाकरिता स्वाभिमानी शिक्षक मंडळाकडून सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय सभासदांना उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे, त्यामुळे विरोधक पुन्हा आपली बँकेत सत्ता येणार नाही म्हणून निराश आणि हतबल झाले आहेत असे मत शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बसवराज येलगार यांनी व्यक्त केला. ते शिक्षक संघांचे जिल्हा अध्यक्ष तथा शिक्षण समिती सदस्य मा. विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जत तालुका शिक्षक संघाच्या कार्यकारणी बैठकीत बोलत होते. सत्ताधारी संघटनेतील काही नेते मिरज तालुक्यातून स्वाभिमानी शिक्षक मंडळास उमेदवार मिळाला नाही अशी बिनबुडाची टीका करत सुटले आहेत.पण स्वाभिमानी शिक्षक मंडळाकडून मिरज तालुक्यातून लोकप्रिय सभासदांना संधी मिळाली असल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि पुन्हा आपली सत्ता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे सत्ताधारी संघटनेचे नेते वाटेल तसें बिनबुडाचे आरोप करत आहेत,मात्र सभासद त्यांना यावेळेस बाहेरच रस्ता दाखवल्याशिया गप्प बसणार नाहीत असा टोला श्री.येलगार यांनी लावला.

 

 

आमचे नेते विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शिक्षक मंडळाची सत्ता,सभासदांच्या आशिर्वादाने सत्तेत शंभर टक्के येणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी स्वाभिमानी शिक्षक मंडळाचे जत तालुक्यातील उमेदवार फत्तू नदाफ आणि गांधी चौगुले, तालुका अध्यक्ष मा.दिलीप पवार, सरचिटणीस मा.प्रकाश गुदळे, जकापा कोकरे,देवाप्पा करांडे,नितीन वाघमारे,सुभाष शिंदे,भगवान नाईक, सिकंदर शेख,मौलाली शेख, शिवाजी महाजन, यलाप्पा अभंगे, आदी शिक्षक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here