माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांना जतमध्ये आदरांजली

0
Post Views : 457 views
जत,संकेत टाइम्स : काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त काल बुधवारी विविध कार्यक्रम पार पडले. त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

 

माजी आमदार सनमडीकर यांचे चिरंजीव डॉ. कैलास आंबेकर यांनी आपल्या जत येथील कमल आर्थोपेडिक सेंटर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सांधेदुखी व गुडघेदुखी या आजारावर मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या पत्नी श्रीमती कमल सनमडीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

तसेच जत तालुक्यातील माडग्याळ, सनमडी व जत येथे त्यांच्या शिक्षण संस्थेत माजी आमदार माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांना जतमधील सिध्दार्थ शिक्षण संस्थेत व उमाजीराव सनमडीकर मेडीकल फाऊंडेशन या संस्थेतही त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

 

यावेळी जत येथील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर मनोहर मोदी, डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. सौ. वैशाली सनमडीकर, श्रीपाद जोशी, प्रमोद पोतनीस, शिवाजीराव बिसले, आर. के. पाटील, बाबासाहेब कोडग, संजय कांबळे, विक्रम ढोणे, नाना शिंदे, दिग्विजय चव्हाण, मोहन माने- पाटील आदी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.