स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या उमेदवारांना सभासदांनी मतदान करावे ; बसवराज येलगार

0
जत,संकेत टाइम्स : शिक्षक बँकेच्या येणाऱ्या 3 जुलै रोजी होणाऱ्या मतदानाकरिता स्वाभिमानी शिक्षक मंडळाकडून सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष सभासदांना उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे, त्यांना सभासदांनी प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आव्हान शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष बसवराज येलगार यांनी केले आहे.लोकप्रिय उमेदवाराना संधी दिल्यामुळे,सत्ताधारी पुन्हा आपली बँकेत सत्ता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे निराश आणि हतबल झाले आहेत.

 

श्री येलगार शिक्षक संघांचे जिल्हा अध्यक्ष तथा शिक्षण समिती सदस्य विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जत तालुका शिक्षक संघाच्या कार्यकारणी बैठकीत बोलत होते. सत्ताधारी संघटनेतील काही नेते मिरज तालुक्यातून स्वाभिमानी शिक्षक मंडळास उमेदवार मिळाला नाही अशी बिनबुडाची टीका करत सुटले आहेत.पण स्वाभिमानी शिक्षक मंडळाकडून मिरज तालुक्यातून लोकप्रिय सभासदांनाउमेदवार म्हणून संधी मिळाली असल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,सुज्ञ सभासद त्यांना यावेळेस बाहेरच रस्ता दाखवल्याशिया गप्प बसणार नाहीत असा टोला श्री.येलगार यांनी लावला.

 

यावेळेस विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शिक्षक मंडळाची सत्ता,सभासदांच्या आशिर्वादाने सत्तेत शंभर टक्के येणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

यावेळी स्वाभिमानी शिक्षक मंडळाचे जत तालुक्यातील उमेदवार फत्तू नदाफ आणि गांधी चौगुले,कास्ट्रायब संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष लखन होनमारे,तालुका अध्यक्ष दिलीप पवार, सरचिटणीस प्रकाश गुदळे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी,जकापा कोकरे,देवाप्पा करांडे,नितीन वाघमारे,सुभाष शिंदे,भगवान नाईक, सिकंदर शेख,मौलाली शेख, शिवाजी महाजन, बाळासाहेब पाटोळे,यलाप्पा अभंगे, आदी शिक्षक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.