जत,संकेत टाइम्स : सांगली अर्बन बँकेत स्व.म.ह.तथा अण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलचा विजय निश्चित असून गेल्या पाच वर्षात
गाडगीळ याच्या चांगल्या कारभारामुळे बँकेचा नावलौकिक वाढला आहे,असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केले.
सांगली अर्बन बँकेचे प्रमुख गणेश गाडगीळ यांच्या प्रचारासाठी जमदाडे यांनी बनाळी, निगडी व येळवी येथे सभासदाची भेट घेत गाडगीळ यांच्या पँनेलला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सांगली अर्बन बँकेत बिनविरोध निवडून आलेले संचालक डॉ.रवींद्र आरळी ,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी उपस्थित होते.
जमदाडे पुढे म्हणाले,बँकेचे जत तालुक्यातही मोठ्या संख्येने सभासद आहेत.यापुर्वीच बँकेत जतचे डॉ.रविंद्र आरळी हे बिनविरोध निवडून आले आहेत.या पँनेलने जतच्या सभासदाला बिनविरोध करून न्याय दिला आहे.
पँनेल प्रमुख गणेश गाडगीळ यांनी बँकेचा कारभार पारदर्शी केला आहे.गत पाच वर्षात त्यांनी एनपीए कमी करत बँकेला सुस्थितीत आणले आहे.
या निवडणूकीत त्यांच्या पँनेलला जत तालुक्यातील सभासदाचा मोठा पांठिबा मिळत आहे.गोडबोले पँनेललाच जत तालुक्यातील सभासदांनी मतदान करून विजयी करावे,असे आवाहनही जमदाडे यांनी केले आहे.