जावयाने केला सासू-सासऱ्यांचा खून
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत अमर नगर परिसरात दुहेरी हत्याकांड झाले असून पाेलीस घटनास्थळी पाेहचले आहेत. प्राथमिक माहितीनूसार नरमु यादव या व्यक्तीने दारूच्या नशेत मध्यरात्री त्याच्या वृद्ध सासू-सासर्यांवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत भगवान रेवारे आणि पुष्पा रेवारे गंभीर जखमी झाले हाेते. त्यांचा मृत्य झाला आहे.
