बालचमुंची इंग्लिश शाळा,’लिटील चँम्प प्री-स्कूल अँन्ड अँक्टिव्हिटी सेंटर जत
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील वैद्यकीय व्यवसाय करत शहरातील लहानग्यांना इंग्लिश शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून डॉ.राजेश पतंगे व डॉ.गिता पतंगे यांनी लिटील चँम्प प्री-स्कूल व अँक्टिव्हिटी सेंटरची सुरूवात केली आहे.
यंदाचे हे पाचवे वर्ष आहे.सन २०२२-२३ च्या प्ले हाऊस,प्ले ग्रुप,एल के जी आणि यु के जी च्या या वर्गासाठी प्रवेश सुरू झाला असून मर्यादित प्रवेश संख्या असल्याने तातडीने प्रवेशासाठी पालकांनी संपर्क करावा असे आवाहन संचालिका डॉ.गिता पतंगे यांनी केले आहे.या सेंटरमध्ये उच्च शिक्षित शिक्षिका स्टॉप व तज्ञ मार्गदर्शक,प्रवेशित पालकांचा वॉटस् अप ग्रुप,संपुर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमाचे सुयोग्य नियोजन, सणावाराचे परंपरा,सहली,सुर्यनमस्कार,वार्षिक स्नेहसंमेलन हे या सेंटरची खास वैशिष्ट्ये आहेत.

या सेंटरची फी ही माफक, पालकांना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे.जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या पतंगे हॉस्पिटलच्या वरील हॉलमध्ये हे सेंटर सुरू आहे.स्पर्धेच्या युगात टिकणाऱ्या इंग्रजी शाळेच्या सर्व अँटिव्हिटी येथे शिकविण्यात येतात.विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचे काम येथील तज्ञ शिकत करत आहेत.
जतेतील लहानग्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे स्वप्न
जत शहरातील लहानग्यांना आपल्या घराजवळच शैक्षणिक सेवा मिळावी,त्यांना लहान वयातच शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करण्याचे स्वप्न आमच्या स्कूलचे असून प्रत्येक विद्यार्थी येथे स्पर्धेत टिकेल अशा पध्दतीने तयार केला जातो.हे आमचे वैशिष्ट्य आहे.
डॉ.राजेश पतंगे,संचालक