करजगी पंचायत समिती गटामधून ताकतीने लढविणार ; रावतराय तेली

0
करजगी,(कल्लण्णा बालगांव) : करजगी (ता जत) येथील पूर्वी उमदी जिल्हा परिषद गटामध्ये असलेले करजगी पंचायत समिती गट आता स्वतंत्र जिल्हा परिषद गट झाला आहे आणि करजगी पंचायत समिती गट मध्ये करजगी, भिवर्गी,मोरबगी, माणिकनाळ, गिरगाव, असे पाच गावे येतात.सामाजिक कार्यकर्ते उच्चशिक्षित सर्वसामान्यांच्या काम करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व कला क्रीडा क्षेत्रात नेहमी पुढं असणाऱ्या नुकतंच झालेल्या करजगी सोसायटीचे पंचवार्षिक निवडणूक मध्ये पॅनल जिंकण्यासाठी एक सिंहाचा वाटा असलेले आदर्श व्यक्तिमत्व युवा नेते रावतराय तेली निवडणूक लढविणार हे
निश्चित झाले आहे.

 

त्यांनी सहकारी मित्र असलेले तम्माराय सालुटगी, सायबण्णा ककमरी, मल्लिकार्जुन अक्कलकोट सायबण्णा बालगांव(उपसरपंच)उत्तम कट्टीमनी,  सोमनिंग बमनळ्ळी, ज्ञानेश्वर बमनळ्ळी, प्रवीण तेली, नागूअण्णा हंजगी यांना सोबत घेत प्रत्येक गावात संपर्क वाढवला आहे.प्रत्येक गावात फिरत असताना लोकांचे चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यासाठी लोकांच्या आग्रहामुळे लोकांच्या हितासाठी मी करजगी पंचायत समिती गटामध्ये तुमच्या सेवेसाठी तुमच्या सर्वांगीण विकासासाठी मी ताकतीने लढवून जिंकू, असे रावतराय तेली यांनी सांगितले आहे
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.