OTS वन टाईम सेटलमेट योजनेची मुदतवाढ मिळावी 

0
Post Views : 123 views
सांगली :  OTS वन टाईम सेटलमेंट योजनेची मुदतवाढ 30 जुन 2022 ला संपलीआहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही त्या योजनेची मुदत वाढ मिळावी या मागणीचे निवेदन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस टी वाघ यांना दिले
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना अर्थात OTS योजना सुरू केली ही OTS योजना 30 जुन 2018 पुर्वी थकित असणार्या शेतकऱ्यांसाठी लागु करण्यात आली आहे  या योजनेचा लाभ 30 जून 2022 पर्यंत शेतकरी घेवू शकणार होते मात्र अनेक सोसायट्यांनी ही योजना लवकर स्वीकारली नाही. त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत म्हणूनच या योजनेची मुदत वाढवावी अशी मागणी करण्यात आली

 

या बाबतीत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस टी वाघ यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाशी चर्चा करून या योजनेची मुदत वाढविली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.याबाबतीत महेश खराडे म्हणाले, ओटीअस योजना सुरू करावी यासाठी संघटनेच्या वतीने आम्ही आग्रह धरला होता.त्यामुळे बँकेने ही योजना सुरू केली ही  योजना शेतकऱ्याच्या हिताची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होवून लाभ घ्यावा यावेळी  योजना 2023‌ पर्यंत सुरू राहणार आहे.ठेवावी असा आग्रह संघटनेने धरला होता, त्यामुळे ही योजना पुढेही चालू राहणार आहे.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.