जत तालुक्यात शेवटच्या श्वासापर्यत शिवसेना जिंवत ठेवू ; दिनकर पंतगे | जतच्या शिष्ठमंडळाने घेतली माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट

0
जत,संकेत टाइम्स : कोणतेही संकट येऊदे,राज्याच्या हितासाठी आपणाला लढावे लागणार आहे.माझ्या शिवसैनिकाच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे,जत तालुक्यात शिवसेना भक्कम करा,असे सुचना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.मुंबई येथील शिवसेना भवनमध्ये झालेल्या बैठकीला कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळ उपस्थित होते.यावेळी पंतगे,अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष तात्या कोळी,श्रीशैल उमराणी,दत्तात्रय कोरे,सुभाष लक्ष्मण कोळी,चंद्रकांत अडगळे यांनी ठाकरे यांची भेट घेतली.संपर्कप्रमुख तानाजी गुरव यांनी हि भेट घडवून आणली.

 

यावेळी ठाकरे यांनी जत तालुक्यातून आलेल्या या शिवसैनिकांशी संवाद साधत,शिवसेनाची परिस्थिती जाणून घेतली.शिवसेनेतील बंड आम्ही मोडून काढू,जत तालुक्यात शिवसेनेला गतवैभव आणण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यत आम्ही काम करत राहू,शिवसेनाचा समाज कार्याचा विचार लोकात रूजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,असा विश्वास पंतगे यांच्या शिष्टमंडळाने यावेळी ठाकरे समोर व्यक्त केला.

 

जत तालुक्यात महाराष्ट्र कामगार सेना,महाराष्ट्र कलाकार सेना,महाराष्ट्र कामगार सेना महिला आघाडी,शिव वाहतूक सेना,शिवसेना महिला आघाडी व इतर शिवसेना अंगीकृत सर्व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने जत तालुक्यात नव्याने ताकतवान शिवसेना उभी करतील,साहेब काळजी करू नका,असे यावेळी श्री.पतंगे यांनी आशावाद व्यक्त केला.
Rate Card
तात्या कोळी यांना अश्रु अनावर
खलाटी येथील वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष तात्या कोळी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जत तालुक्यात येत नाहीत,तोपर्यत पायात चप्पल घालणार नाही,अशी प्रतिज्ञा केली होती.मात्र शिवसेनेतील बंडखोरामुळे दुर्देवाने संत्तातर झाले.तात्या कोळी यांना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काळजी करू नका,पुढचे सरकार आपलेच असेल,जत तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना प्रयत्न करेल,असा विश्वास देताच तात्या कोळी यांना अश्रू अनावर झाले.साहेब आम्हच्या शेवटच्या श्वासापर्यत शिवसेना जिंवत ठेवू,असे यावेळी तात्या कोळी म्हणाले.दरम्यान ठाकरे यांची भेट झाल्याने कोळी यांनी आपली प्रतिज्ञा मागे घेतली.राज्याचे समन्वयक दगडू संकपाळ यांचे जतच्या शिष्ठमंडळांने आभार मानले.
माजी मुख्यमंत्री तथा शिवेसना प्रमुख उध्दव ठाकरे यांची जत तालुक्याच्या शिष्टमंडळाने भेट घेतली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.