मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर्षी आषाढी एकादशी पूजा करणार
Post Views : 26 views
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले.यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला.
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते.
