तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार कोसळला

0

 

रायगड : रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे.या स्मारका जवळ असणारे ३०० वर्ष जुने शिवकालीन आंब्याचे झाड सोमवारी मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे.झाड कोसळल्यामुळे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

 

हे आंब्याचे झाड स्वतः तानाजी मालुसरे यांनी लावल्याचे माहिती मिळत आहे.हेच आंब्याचे झाड तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जातं होत.काही वर्षांपूर्वी आंब्याची डहाळी तुटली असता त्यातून तलवारी पडल्या,असे सांगितले जात आहे.त्यातील दोन तलवारी तेथेच असून बाकीच्या तलवारी पुणे येथे नेण्यात आल्या आहेत.
हे झाड कोसळल्याने शिवप्रेमी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.कोसळलेले आंब्याचे झाड हटवण्याचे काम नरवीर रेस्क्यू टीमतर्फे युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

Rate Card

झाडाच्या ढोलीत शिवकालीन शस्त्रे देखील सापडल्याचे सांगितले जात आहे.शिवकालीन ऐतिहासिक झाड कोसळल्याने शिवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही प्रमाणात स्मारकाच्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.