जत तालुक्यातील विद्यार्थ्यांचे नवोदय परिक्षेत यश ; तालुक्यातील पात्र विद्यार्थी वाचा सविस्तर

0
नवोदय विद्यालयासाठी जत तालुक्यातून सहा विद्यार्थ्यांची निवड
जत, संकेत टाइम्स: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा (2022 ) चा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. जत तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय, पलूस येथील शिक्षणासाठी निवड झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रतीलला साळुंखे यांनी दिली.

 

यामध्ये जत तालुक्यातील  प्राथमिक शाळांतीळ पाच आणि माध्यमिक शाळेचा एक विद्यार्थी  असे सहा विद्यार्थी या नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी रतीलाल साळुंखे, विस्तार अधिकारी तानाजी गवारी, अन्सार शेख तसेच सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक आदींचे मार्गदर्शन मिळाले.

 

नवोदय विद्यालयासाठी तालुक्यातील पात्र विद्यार्थी :  श्रेया सूर्यकांत पाटील (एम.व्ही हायस्कुल उमदी)’ गोकुळ शेखर जाधव,   (जि.प.शाळा जालिहाळ बु) ,कु. शांभवी गोविंद कुलकर्णी,  (जि. प. शाळा नं.२ डफळापूर)’  ईश्वरी अजय पाटील (जि. प.शाळा बागेवाडी)’ सई दीपक काशिद, (जि. प.शाळा लोहगाव)’ प्रिन्स विकास खुडे, (जि. प.शाळा जादरबोबलाद) वरील सहा पैकी पाच विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.