जत, संकेत टाइम्स : जत शहरातील संभाजी पॅलेससमोरील नाना नगरमध्ये राहणारे अर्जुन आप्पाण्णा लोखंडे (वय ३४) यांचे घर फोडून चोरट्यांनी तीन लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. दि. १० जुलै रोजी चोरीची ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अर्जुन लोखंडे दि. १० जुलै रोजी दुपारी तीन वाजता कुटुंबासह नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून घरात
प्रवेश केला. बेडरुममधील तिजोरी उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील सोन्याचे घंटण साखळी, अंगठ्या, झुबे, कानातील वेल असे एकूण तीन लाख ८० हजाराचे दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले.लोखंडे कुटुंब रात्री पावणेदहा वाजता घरी आले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन
पंचनामा केला.