नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम स्थगीत            

0

 सांगली: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम-2022 दि. 8 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये जाहीर केला होता. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 ची सुनावणी दि. 12 जुलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत ‍दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

 

सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी दि. 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य  निवडणूक आयोगाने दि. 8 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये जाहीर केलेला 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम-2022 स्थगीत केला आहे. या निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल.

 

निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.