सांगली : तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत साहेबराव शिंदे गणेश (वय ३७) या युवकाचा चौघांनी मिळून किरकोळ कारणाने कुर्हाड व चाकू अशा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आणखी एका संशयिताचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मणेराजुरी येथील एका चौकात साहेबराव शिंदे गणेश आणि लखन कांबळे या दोघांत शुक्रवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. दोघांनीही एकमेकांना बघून घेतो असा दम भरला हाेता.
याच कारणावरून शनिवारी मणेराजुरी गव्हाण रस्त्यावर समाज मंदिराजवळ रात्री साडेआठच्या सुमारास रोहन उर्फ रुपेश अनिल माने तसेच गुंड्या उर्फ दादासाहेब कांबळे, बापूसाहेब उर्फ बाजीराव चव्हाण आणि लखन कांबळे या चौघांनी साहेबराव शिंदे याला मारहाण केली.कुऱ्हाड,चाकूने हल्ला केल्याने शिंदेचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी तिघांना पोलीसांनी अटक केली आहे, तर फरार एकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.