मिरज : बंद असलेल्या इमारतीत केलेली पार्टी चांगलीच महागात पडल्याची घटना घडली असून तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मिरज तालुक्याच्या गुंडेवाडीतील तरुण जागीच ठार झाला आहे. बंद पडलेल्या डी एम के टोयोटा इमारतीत ही घटना घडली आहे. अक्षय कुमार माने वय 21 राहणार कैकडे गल्ली गुंडेवाडी असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास तांनग फाटा येथे बंद पडलेल्या डी एम के टोयोटा शोरुमच्या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षक व त्याच्या मित्रांने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्टी आयोजित केेेली होती. सुरक्षारक्षकसोबत अक्षय माने आणि गुंडेवाडी येथील आणखी दोघे मित्र असे चौघे या पार्टीचा आस्वाद घेत होते.
दारुच्या नशेत खाली उतरताना अक्षय हा तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडल्यानंतर सनी माने याने मयत अवस्थेत अक्षय माने याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकणी मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.