जत तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा | खरीप हंगाम वाया जाण्याची भिती

0
जत,संकेत टाइम्स : कोल्हापूरसह जिल्ह्यातील काही भागात मागील आठवडाभरापासून झोडपल्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा नदी दुभडी भरुन वाहत असताना दुष्काळी जत तालुक्यात मात्र अद्याप म्हणावा तसा दमदार पाऊस झालेला नाही. जतकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जत तालुक्यावर अद्याप वरुणराजाची म्हणावी तशी कृपा झालेली नाही.
रोहिणी व मृग नक्षत्रावर पावसाचे आगमन झाल्याने जतमधील बळीराजा सुखावला होता. यंदाही वरुणराजाची दमदार हजेरी लागेल व खरीप हंगाम पार पडेल, अशीच अपेक्षा होती.पण पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हवालदील झाला होता. मागील दहा दिवसापासून तालुक्यात आल्याने ढगाळ वातावरण बळीराजाला दमदार पावसाची हजेरी लागेल अशी अपेक्षा होती.परंतु तीही फोल ठरली आहे.सांगली,कोल्हापूर राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला आहे.

 

नद्यांना पूर आले आहेत.मात्र गेल्या दहा दिवसात जत तालुक्यात भूरभूर वगळता दमदार पाऊस अद्याप झालेला नाही.रिमझिम पावसाने पिके हिरवी झाली खरी मात्र मोठा पाऊस झाला नसल्याने पाऊस बंद होताच पिकांना मरगळ आली आहे.या आठवड्यात चांगला पाऊस झाला तरच पिके टिकणार आहेत,अन्यथा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.