लायन्स क्लब ऑफ सांगली-उमदी प्राईडचा शपथविधी,पदग्रहण सोहळा 

0
Rate Card
जत,संकेत टाइम्स : लायन्स क्लब ऑफ सांगली सिटी व लायन्स क्लब ऑफ सांगली-उमदी प्राईड असे संयुक्त क्लबचे शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

 

सांगली येथे महेश्वरी भवन वखार भाग या भावनांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून पी एम जे एफ ट
श्री.सुतार साहेब, सेक्रेटरी मल्टिपल कौन्सिल व अँड.विजय जमदग्नी,इंडक्शन ऑफिसर व उमदी प्राईडचे चार्टर प्रधान सुतार,अध्यक्षस्थानी सांगली सिटीचे अध्यक्ष सौ.स्मिता बजाज व माजी रिजन चेअरमन तसेच जी टी चेअरमन डॉ.रवींद्र हातळी(उमदी) तर रिजन चेअरमन म्हणून दिनकर पतंगे रिझन सेक्रेटरी म्हणून सुरेखा पतंगे व झोन चेअरमन बजाज चंद्रशेखर हे उपस्थित होते.
लायन्स क्लब सांगली सिटीचे सर्व पदाधिकारी सर्व कॅबिनेट ऑफिसर्स सर्व जेष्ठ सदस्य व खास करून पीडीजी सुभाष अरवाडे सर व महावीर प्रसाद मालानी,शरद शहा,डॉक्टर भोकरे, बाबासाहेब कलशेट्टी,संजय मालानी व बजाज,गाडगीळ,मालानी, कलशेट्टी कंपनीचे सुमारे ८० मेंबर्स उपस्थित होते. यावेळी शरद शहा,विविध लायन्स क्लब मेंबरच्या मुलांनी विविध कार्यक्षेत्रात
उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

यापुढे लायन्स क्लब ऑफ सांगली-उमदी प्राइड आणि सांगली सिटी असं संयुक्त क्लब सामाजिक कार्य करत राहिल,असे डॉ.हत्तळी यांनी सांगितले.
सांगली : लायन्स क्लब ऑफ सांगली-उमदी प्राईडचा शपथविधी,पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.