उद्योजक मिरासाहेब(सचिन)कलावंत करजगी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढविणार

0
गावाच्या मातीशी असलेली नाळ व लोकांच्या हितासाठी असणारी तळमळ गप्प बसू देत नाही.आपल्या मातीतील प्रत्येक माणूस,कुंटुंब सुखी,समाधानी झाले पाहिजे,आपण समाज्याचे काहीतरी देणे लागतो,या युक्तिप्रमाणे समाजहितासाठी झोकून देऊन काम करणारे जननायक असणारी काही माणस असतात.आपला व्यवसाय करून स्व:ताबरोबर समाजासाठी काहीतरी करायची उर्मी असणारी अनेक माणस जतच्या दुष्काळी मातीने बनविली आहेत.

 

अशापैंकीच एक असणारे करजगी जिल्हा परिषद मतदार संघातील विजापूर सारख्या शहरात जाऊन आपला उद्योग, व्यवसाय उभारलेले उद्योजक मिरासाहेब(सचिन)कलावंत हे होत.कर्नाटकाचे कॉग्रेस नेते माजी गृहमंत्री,जलसंपदामंत्री तुबची-बबलेश्वर सिंचन योजनेचे जनक एम.बी.पाटील यांचे निकटवर्तीय मिरासाहेब(सचिन)कलावंत यांनी विजापूर येथे अपार कष्ट,विश्वासहर्ता,गुणवत्ता जपत लायन्स हार्ट फोर्स प्रा.लि.,लायन्स फायनान्स कार्पोरेशन, गुरूकृपा अँग्रो मँन्युफँकचरिंग,
श्री.विनायक रियल इस्टेट हे उद्योग भरभराटीस आणत या माध्यमातून शेकडो हातांना काम देण्याचेही काम त्यांनी केले आहे. या उद्योगातून आपले वेगळेपण सिध्द केले आहे.आपल्या उद्योगाबरोबर सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी समाजिक बांधिलकी जपली आहे.

 

मि

आता आपल्या मायभूमीचे काहीतरी देणे लागतो,या उक्तीप्रमाणे ते करजगी परिसरात कायापालट करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत आहेत.
महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ते करजगी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.
करजगी येथे माझा जन्म झाला.या भागातील दुष्काळी परिस्थिती,हाताला काम नसल्याने विजापूर सारख्या शहरात जाऊन कष्टाच्या बंळावर आज मी उद्योग उभारून भरभराटीस आणले आहेत.आपण आपल्या जन्मभूमीसाठी काही करूया या हेतूने मी निवडणूक लढविणार आहे.या परिसरातील अनेक वर्षापासून प्रंलबित असणारे सिंचन योजना,पिण्याचे पाणी रस्ते,बेरोजगार तरूणांच्या हाताला काम व दुष्काळ हा कंलक मिटविण्यासाठी मला जनतेनी साथ द्यावी.
– मिरासाहेब(सचिन)कलावंत 
उद्योजक,करजगी
लोकहित, सामाजिक तळमळ असणारे युवा नेतृत्व 
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.