खुला-करजगी, बनाळी, माडग्याळ,बाज, बिळूर, उमराणी, मुचंडी असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
जत पंचायत समितीची सत्ता गेल्या पाच वर्षात भाजपाकडे होती.यंदा पुन्हा राज्यात भाजपा सरकार असल्याने भाजापासाठी प्लस पांईट झाला आहे.भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आरक्षण जाहीर होताच रणशिंग फुंकले असून आजपासून तालुक्यात त्यांचा मँरेथान दौरा सुरू होणार आहे.दुसरीकडे कॉग्रेस,राष्ट्रवादीकडून तयारीला गती आली आहे.
दरम्यान अनेकजण मैदानात उतरण्यासाठी तयारी असताना आरक्षण पडल्याने त्यांची निराशा झाली आहे.तालुक्यात करजगी,माडग्याळ, वाळेखिंडी जिल्हा परिषद गट व सिध्दनाथ,उटगी पंचायत समिती गण नव्याने झाल्याने उमेदवार शोधताना पक्ष नेतृत्वांचे कस लागणार आहे.