ग्राहकांच्या सोईसाठी सुट्टीदिवशी विजबिल भरणा केंद्र सुरु 

0
Rate Card
कोल्हापूर : ग्राहकांना विजबिलाचा भरणा करणे सोईचे व्हावे ,यासाठी जुलै अखेर शनिवार व रविवारी (३० व ३१ जुलै) सुट्टीदिवशी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत विजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. परेश भागवत यांनी दिले आहेत.

ग्राहकांना घरबसल्या  महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा  www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे विजबिल भरण्याची व इतर  सुविधा उपलब्ध आहेत.

आपल्या विजबिलावरील छापिल क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन विजबिल भरता येते. अखंडित वीज सेवेसाठी चालू व थकीत विजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.