शिराळ्यात बेकायदा नाग पकडल्याप्रकरणी दोघांवर वनगुन्हा दाखल 

0
शिराळा :  अवैध रित्या ३ नागांना पकडून ठेवल्या प्रकरणी दोन संशयितांना शिराळा वन विभागाने ताब्यात घेतले आहे.विशाल अशोक पवार,(वय २९),हर्षद प्रकाश वडार (वय १७, दोघे रा.कुरळप,ता.वाळवा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार संशयित आरोपी विशाल अशोक पवार, हर्षद प्रकाश वडार यांनी परीट मळा येथील शुभम परीट यांचे शेतातील वापरात नसलेल्या घरामध्ये ३ नाग लपवून ठेवले होते.उपवनसंरक्षक (प्रा.) सांगली श्रीमती निता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ.अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली  सचिन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी शिराळा, श्रीमती पल्लवी चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी कडेगांव पलूस,सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर, अमोल साठे वनरक्षक बावची, प्रकाश पाटील वनरक्षक बिळाशी, श्रीमती रायना पाटोळे वनरक्षक रेड, वनरक्षक सुनिल पवार व सर्प मित्र अमित कुभांर यांनी धाड टाकून तिन्ही नागास ताब्यात घेतले.

 

Rate Card
संशयित विशाल पवार व हर्षद वडार यांचेवर वन्यजीव(संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.शिराळा वनपरिक्षेत्राअंतर्गत मागील ८ दिवसांत सागर लक्ष्मण यादव(रा. चिकुर्डे), संग्राम शिवाजी औघडे (रा. आष्टा) यांचेवर वन्यजीव(संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला असून आता हा सलग तिसरा वन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की नाग वन्यजीव बाळगणे, नाग/ सापाचा आधिवास उध्दवस्त करणे, नाग/ साप पकडणे, डांबुन ठेवणे, खेळ करणे, प्रदर्शन करणे इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास संबंधितांविरुध्द कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती वनविभागा कडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.