संख,(रियाज जमादार) ; माणिकनाळ ता.जत येथील डांळिब पिंकात बेकायदेशीर लावलेल्या गांज्या शेतीवर उमदी पोलीसांनी छापा टाकत तब्बल सव्वातेरा लाखाचा ओला गांज्या जप्त केली आहे.याप्रकरणी महासिध्द लक्ष्मण बगली रा.माणिकनाळ याला ताब्यात घेतले आहे.बुधवारी दुपारी २.०० वाजता ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी, माणिकनाळ येथील महासिध्द बगली यांनी डांळिबाच्या शेतात गांज्याची झाडे लावल्याची माहिती खबऱ्याकडून सा.पो.नि.पंकज पवार यांना मिळाली होती,त्या आधारे छापा टाकला असता डाळिंब बागेमध्ये हिरव्या रंगाची ओलसर पानाची व उग्र वासाचे ५ ते ६ फुट उंचीचे ७८ झाडे बेकायदा लावल्याची आढळून आली.त्याचे वजन १३३ किलो ९१ ग्रँम भरले आहे.बाजारभावा प्रमाणे प्रति किलो १० हजार दराने तब्बल १३ लाख ३९ हजार १०० रूपये होतात.सर्व रोपे वजन करून पंचासमक्ष पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.
पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम,अपर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले,डीवायएसपी रत्नाकर नवले यांच्या आदेशानुसार सा.पो.नि.पंकज पवार,उप निरिक्षक लक्ष्मण खरात यांच्या पथकांने हि कारवाई केली आहे.
उमदी पोलीसांनी माणिकनाळ येथे छापा टाकून पकडलेली गांज्याची रोपे




