तैवानचा युक्रेन होऊ नये     

0

रशिया युक्रेन युद्ध अजूनही संपले नसताना आता जगावर पुन्हा नव्या युध्दाचे ढग  जमले आहे. युक्रेन युद्धावेळी अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता समोरासमोर आल्या होत्या आता अमेरिका आणि चीन या दोन महासत्ता समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत त्याला निमित्त ठरले ते अमेरिकेन सिनेटच्या अध्यक्षा  नॅन्सी पॉल यांचा तैवान दौरा. नॅन्सी पॉल यांनी नुकताच तैवान या देशाचा दौरा केला. नॅन्सी पॉल यांच्या तैवान दौऱ्याला चीनने कडाडून विरोध केला होता. तैवान हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. तैवान जरी स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानत असले तरी चीन त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला तयार नाही. तैवान हा आमचा भूभाग असल्याने त्यात अन्य राष्ट्राने नाक खुपसू नये. आमच्या परवानगी शिवाय कोणत्याही देशाच्या नेत्यांनी तैवानचा दौरा करू नये अशी चीनची भूमीका आहे. हीच भूमिका चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यापुढे मांडली होती. या दोन नेत्यांत काही दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक झाली होती

 

यावेळी शी जिनपिंग यांनी नॅन्सी पॉल यांच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला इतकेच नव्हे तर नॅन्सी पॉल यांचा तैवान दौरा झाला तर  त्याची जबर किंमत तैवान आणि अमेरिकेला भोगावे लागेल. ज्यो बायडेन यांनी मात्र शी जिनपिंग यांच्या धमकीला भीक न घालता नॅन्सी पॉल यांना तैवानला पाठवले इतकेच नाही तर चीनवर दबाव आणण्यासाठी अमेरिकन सिनेटने २८० बिलियन डॉलरचा आराखडा मंजूर केला व तैवानला चीन विरोधात लढण्यासाठी संहारक अस्त्रांची मदत करण्याचा ठरावही अमेरिकन सिनेटने मंजूर केला त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे चीन चांगलाच संतापला असून त्यांनी तैवानवर दबाव आणण्यास  सुरवात केली आहे. नॅन्सी पॉल यांचा तैवान दौरा संपताच चीनचे लढाऊ विमाने तैवानच्या सीमेवर घोंघाऊ लागले असून तैवानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रांची जमवाजमव केली असून मोठे शक्तिप्रदर्शन करून तैवानसह अमेरिकेवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. अर्थात या दबावाला अमेरिका बळी पडेल असे वाटत नाही जर अमेरिकेने तैवानमध्ये अशीच ढवळाढवळ सुरू ठेवली तर चीन तैवानवर हल्ला करू शकतो. अर्थात या दोन महासत्तेतील संघर्षात सर्वाधिक नुकसान हे तैवानचेच होईल कारण युद्ध प्रत्यक्ष त्यांच्या भूमीवर लढले जाईल आणि ज्यांच्या भूमीवर युद्ध लढले जाते त्यांचेच सर्वाधिक नुकसान होते हे आपण रशिया युक्रेन युद्धात पाहिले. रशिया युक्रेन युद्धाने युक्रेन बेचिराख झाला असून आज युक्रेनची अक्षरशः माती झाली आहे.

 

उद्या जर चीन तैवान युद्ध झाले तर अमेरिकेचे काहीही नुकसान होणार नाही उलट त्यांचा आर्थिक फायदाच होणार आहे कारण चीनशी लढण्यासाठी तैवान अमेरिकेकडून शस्त्र विकत घेईल त्यामुळे अमेरिकेला आपले शस्त्र विकण्यास आणखी एक हक्काचं ग्राहक मिळेल. तैवानला चिथावण्यामागे अमेरिकेचा हाच उद्देश आहे. याआधी त्यांनी युक्रेनलाही अशाच प्रकारे रशिया विरुद्ध  चिथावले आणि त्यांना युद्धाच्या खाईत लोटले. आताही तैवान संदर्भात अमेरिकेचे हेच धोरण असू शकते त्यामुळे तैवानने सावध राहावे. विनाकारण अमेरिकेच्या नादी लागून स्वतःला युद्धाच्या खाईत लोटून घेऊ नये कारण युद्ध झाल्यास चिनपुढे तैवानचा निभाव लागणार नाही आताजरी अमेरिका तैवानची बाजू  घेत असला तरी प्रत्यक्ष युद्ध सुरू होईल तेंव्हा अमेरिका युद्धात उतरेलच असे नाही. रशिया युक्रेन युद्धातही अमेरिका युक्रेनच्या बाजूने प्रत्यक्ष युद्धात उतरली नाही.

 

Rate Card

श्याम बसप्पा ठाणेदार दौंड

जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.