जत तालुक्यातील या गावात फडकाविला सांगली जिल्ह्यातील सर्वात उंच तिंरगा

0
आंवढी,संकेत टाइम्स : भारताच्या 75 व्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त श्री दत्त कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीने आवंढी (मानिकनगर) तालुका जत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.सांगली जिल्ह्यातील सर्वात उंच 75 फूट उंचीवर तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण जत तालुक्याचे तहसिलदार जीवन बनसोडे यांच्या शुभहस्ते  करण्यात आले.

 

गावातील 670 कुटुंबाच्या घरावरती लोकांनी स्वयंप्रेरणेने आज तिरंगा ध्वज फडकवला गेला आहे. गावातील गावकऱ्यांच व ग्रामपंचायतीचे कर्मचारी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोस्टमन यांनी या कार्यात मोठे सहकार्य केले आहे.

 

 

Rate Card
आवंढी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, सोसायटी चेअरमन लक्ष्मण कोडग, सर्कल मोरे साहेब, जेलर साहेब, माजी उपसरपंच आण्णासाहेब बाबर, दगडू कोडग, सुभाष कोडग, विनोद कोडग व माणिकनगर मधील सर्व शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.