बीडमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

0

बीड : बीडमध्ये कार आणि टेम्पोच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पाटोदा तालुक्यातील बामदळे वस्तीवर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पाटोदा- मांजरसुबा रस्त्यावर हा अपघात घडला आहे. या अपघातात स्विफ्ट कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा -मांजरसुभा रोडवरील पाटोदया जवळ बामदळे वस्ती येथे स्विफ्ट डिझायर कार-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.