एकाच दिवशी एकाच वेळी ३६ कारागृहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

0

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत, राज्यातील ३६ प्रमुख कारागृहात सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला आहे. “जीवन गाणे गातच जावे…” या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात आयोजन होण्याची ही घटना, देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले हे या कार्यक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य!

Rate Card
सांगली जिल्हा कारागृह वर्ग 2 चे अधीक्षक विवेक झेंडे साहेब वरिष्ठ तुरुंग अधिकारी महादेव मोरे , तुरुंग अधिकारी सचिन पाटील प्राध्यापक, डॉक्टर संजय ठिगळे मार्गदर्शक 1947 ते 2022 पर्यंत बदललेला भारत अर्चना मुळे सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन केले मोहन जगताप योगतज्ञ यांनी प्राणायाम योगासने याचे महत्व सांगून प्रात्यक्षिक ही करून  दाखविली.
यानंतर भारुड, बतावणी, बहुरूपी,कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, लावणी, शाहिरी ,देशभक्तीपर गीते इत्यादी लोककला माध्यमातून निर्मिती प्रमुख :- संपत कदम, कृष्णात कदम, कृष्णात पाटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून सर्व कैद्यांचे मनोरंजन व प्रबोधन केले.
महिला व पुरुष बंदिवान व कर्मचारी असे एकूण 300 जण उपस्थित होते उपस्थितांनी पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचा आनंद घेऊन प्रेरणा घेतली.
 कारागृहातील कैद्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
“जीवन गाणे गातच जावे…” या कार्यक्रमात कारागृहातील अनेक कैद्यानी सादरीकरणात सहभाग घेतला. काही कैद्यांनी अप्रतिम वादन, गायन, काव्यवाचन आणि नृत्य करून त्यांच्यातील कलेला सादर केले. कैद्यांमधील कलाकार पाहण्याची दुर्मिळ संधी यावेळेस सर्वांना मिळाली. अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार करावे अशी अपेक्षाही अनेकांनी केली. जाणते आजाणतेपणाने झालेल्या चुकांमुळे, शिक्षा भोगावी लागत असल्याचे काही कैद्यांनी स्पष्ट केले. मात्र आजच्या कार्यक्रमामुळे नवी दिशा मिळालेली असून, भावी आयुष्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल अशी आशाही अनेकानी व्यक्त केली. कार्यक्रमाचे शीर्षक “जीवन गाणे गातच जावे..”, यामुळे ही एक नवी ऊर्जा मिळाली असून, जीवनात नवा अध्याय सुरू करणार असल्याची भावनाही काही कैद्यांनी बोलून दाखवली.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.