सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इस्लामपूर बस आगारात एसटीचे सारथ्य करीत चालकाचा अनुभव घेतला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी इस्लामपूर एसटी आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचे स्टेरिंग त्यांनी हातात घेतले. एसटी चालवत शहरातून फेरफटका देखील मारला. यावेळी, थेट बस चालवताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त इस्लामपुरातील बस आगारात आज उत्साहपूर्ण वातावरण आहे. आपली लालपरी दिमाखात सजली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्याना जोडणाऱ्या या लालपरीचे चालकाच्या मार्गदर्शनाने सारथ्य करण्याचा योग आला. #IndiaAt75 pic.twitter.com/rKsLC6FJm6
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 15, 2022
एसटीच्या ड्रायव्हर सीटवर जयंत पाटील बसल्याचे व ते बस चालवत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. एसटी चालक म्हणून अनुभव घेत, एसटी चालकांच्या सोबत यावेळी त्यांनी संवाद साधला. तसेच, त्यांच्याकडून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. ड्रायव्हर सीटवर बसून जयंत पाटील यांनी एसटीचे वाहक म्हणून माहिती घेतली, तर चालक म्हणून एसटी चालवण्याचा अनुभवही घेतला. विशेष म्हणजे शहराच्या मुख्य रस्त्यावरून जयंत पाटलांनी एसटी चालवताना पाहून अनेकांनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले.