लालपरीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या प्रचंड व्हायरल
एकीकडे एसटी महामंडळाविरोधात आंदोलन करून महाविकास आघाडीला सरकारला धारेवर धरूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना कमी होत नाहीत.
हे मात्र तिवार सत्य आहे.आंदोलनानंतर कर्मचाऱ्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे मात्र त्यांच्या सुरक्षा,व घरघर लागलेल्या एसटी बसेसची अवस्था एसटीला किंबहुना कर्मचाऱ्यासाठी संघर्षाचा काळ आहे.नुकताच लालपरीचा वास्तव दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.
यात बसचे वायफरचे मशीन बंद पडल्याने चक्क चालकचं एका हाताने दोरीने बांधलेला वायफर ओढत आहे.विशेष म्हणजे दुसऱ्या हातात प्रवाशाचे सुरक्षित नेहणारे स्टेंअरिंग आहे.एतकी भीषण स्थितीत एसटीचे चालक काम करत आहेत.

https://m.facebook.com/mcnnews24/videos/
त्यात मोठा धोका आहेचं,त्याशिवाय एसटीच्या ताब्यात नव नव्या बसेस येत असताना अनेक वर्षे एसटीला कोट्यावधीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या लालपरीकडे दुर्लक्ष का? असाही प्रश्न सोशल मिडियावर व्यक्त होत आहे.चालक,वाहकासह प्रवाशाचा जीव धोक्यात घालून चालणारी दीवघेणा प्रकार थांबणार तर कधी? यावरी खल सुरू आहे.
