घटस्फोटासाठी अर्ज, संसार करण्याची हमी दिली,त्यानंतर कोर्टातच चिरला पत्नीचा गळा

0
1
कोर्टातच पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटक मध्ये घडली आहे. अगदी काही वेळा पूर्वी या दाम्पत्याने सुखी संसार करण्याची हमी दिली होती. या दाम्पत्याने कौंटुबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. यानंतर दोघांचं काऊंसिलिंग सेशन झालं, यावेळी पती आणि पत्नी दोघांनीही मुलांसाठी सुखी संसार करण्याचं मान्य केलं होतं.

 

 

 

कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पती-पत्नी दोघेही समुपदेशन सत्रासाठी गेले होते. समुपदेशन सत्रादरम्यान, पती-पत्नीने मतभेद विसरून एकत्र राहण्याचे आणि त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी देण्याचे मान्य केले होते. त्यांच्या लग्नाला सात वर्षे झाली होती. हल्ल्यानंतर त्या आरोपी पतीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. महिलेला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

नेमक काय घडलं?

कर्नाटकातील होलेनरसीपुरा कौटुंबिक न्यायालयात पती शिवकुमार आणि पत्नी चैत्र यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर पती-पत्नी दोघेही समुपदेशन सत्रासाठी गेले होते. काऊंसिलिंग सेशनमध्ये दोघांनी नातं वाचवण्यासाठी एक संधी देण्याचं ठरवलं. यानंतर बाहेर येताच चैत्र प्रसाधनगृहाकडे जात असताना त्याने पत्नीवर मागून हल्ला करत तिचा गळा कापला. यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण उपस्थितांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here