आईला कुऱ्हाडीने मारले,मुलानं बापास केलं ठार

0

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत शिवाजी थोरात याने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर वार केला होता. आईला कुर्‍हाडीने मारुन जखमी केले म्हणून शिवाजी थोरात यांचा मुलाने झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. त्यात शिवाजी यांचा मृत्यू झाला

दरम्यान बहिणीला कुर्‍हाडीने मारल्याचा राग मनात धरुन शिवाजी यांचा मेव्हुणा भीमराव जाधवने ही देखील त्यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने दोन्ही हात, पाय, मांडी आणि छातीवर मारहाण केल्याचे पाेलिसांनी सांगितलं.

 

या गुन्ह्यातील दोन्ही संशयितांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा सखाेल तपास सुरु असल्याची माहिती रविंद्र मांजरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांनी दिली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.